• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोल्याच्या दोघा तरुणांच्या ‘स्टार्टअप’ ला पुरस्कार

Our Media by Our Media
June 26, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, आंतराष्ट्रीय, कार्यक्रम, बातम्या आणि कार्यक्रम, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
286 3
0
अकोल्याच्या दोघा तरुणांच्या ‘स्टार्टअप’ ला पुरस्कार
41
SHARES
2.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२६ : ‘ॲग्रोशुअर’ या नावाने कृषी अवजारांच्या उत्पादनात नाविन्यपूर्ण प्रयोग करुन शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात कृषी अवजारे उत्पादन करणाऱ्या अकोल्याच्या अक्षय वैराळे व अक्षय कवळे या दोघा विद्यार्थ्यांच्या स्टार्टअपला नुकताच युनायटेड नेशन डेव्हलेपमेंट प्रोग्रॅम, अटल इनोव्हेशन मिशन व निती आयोग आयोजित ‘युथ को-लॅब’ स्पर्धेतील लैंगिक समानता व महिला आर्थिक सक्षमीकरण या गटातील पुरस्कार मिळाला आहे.

ॲग्रोशुअर प्रॉडक्टस ॲण्ड इनोव्हेशन, शिवनी जि. अकोला येथे अक्षय वैराळे आणि अक्षय कवळे या दोघा तरुण उद्योजकांनी तीन वर्षांपूर्वी हा उद्योग लहान स्तरावर सुरु केला होता. हे दोघेही तरुण मेकॅनिकल इंजिनिअर असून  निर्मिती व विपणन या दोन्ही बाजू हे दोघे उद्योजक सांभाळतात.  या उद्योगातून ते नऊ जणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करुन देतात. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडतील असे ट्रॅक्टर व पॉवर विडर चलित जोडणी अवजारे बनवितात. त्यांच्या अवजारांमुळे शेतकऱ्यांना कोळपणी, निंदणी, फवारणी, पेरणी, मशागतीची कामे इ. यंत्रचलित करता येतात. त्यामुळे मजूरीच्या खर्चात बचत होते. शिवाय ही यंत्रे स्वतः शेतकरी, कुटुंबातील महिला असे कुणीही चालवू, हाताळू शकतात.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

त्यांच्या याच श्रेणीतील कोळपणी व फवारणी यंत्र या यंत्राच्या स्टार्टअपला युनायटेड नेशन डेव्हलेपमेंट प्रोग्रॅम व निती आयोग आयोजित ‘युथ को-लॅब’ स्पर्धेतील ‘लैंगिक समानता व महिला आर्थिक सक्षमीकरण’, या गटातील पुरस्कार मिळाला आहे.नुकताच (दि.२० जून) नवी दिल्ली येथे युनायटेड नेशन डेव्हलेपमेंट प्रोग्रॅमच्या भारतातील प्रतिनिधी श्रीमती शोको नोडा व अटल इनोव्हेशन मिशनचे  प्रकल्प प्रमुख डॉ. चिंतन वैष्णव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांना २ लाख ४० हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला असून या स्पर्धेसाठी आलेल्या ३७८ स्टार्टअप्स मधून अंतिम १२ स्टार्टअप्सची निवड झाली. त्यात ‘लैंगिक समानता व महिला आर्थिक सक्षमीकरण’, या गटातील पुरस्कार ‘ॲग्रोश्युअर’च्या या दोघा होतकरु व हुशार इंजिनिअर्सना मिळाला.

या दोघा होतकरु इंजिनिअर्सना सन २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्य नाविन्यता परिषद अंतर्गत जिल्हा नाविन्यता परिषदेने ५ लक्ष रुपयांचे अनुदान सोयाबीन व हरभरा कापणी यंत्रासाठी दिले होते. त्यातून त्यांच्या स्टार्टअपची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांना आयआयटी कानपूर कडून पॉवर विडर चलित विविध नाविन्यपूर्ण अवजारांसाठी १० लाख रुपयांचे अनुदान मिळाले होते. त्यानंतर त्यांना मुंबई येथील वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामिण विकास प्रतिष्ठानचा आधुनिक कृषी यंत्र निर्मिती पुरस्कारही मिळाला आहे. आता सध्या त्यांना गुरुग्राम येथे दि.३ व ४ जुलै रोजी होत असलेल्या जी २० परिषदेत त्यांची उत्पादने प्रदर्शनात मांडण्याची संधीही मिळाली आहे.

Previous Post

प्राणी संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करा- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Next Post

ही महत्त्वाची कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करा, अन्यथा बसेल आर्थिक फटका

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
ही महत्त्वाची कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करा, अन्यथा बसेल आर्थिक फटका

ही महत्त्वाची कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करा, अन्यथा बसेल आर्थिक फटका

Rains

मान्सूनने ९५ टक्के देश व्यापला, राज्यात 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.