अकोला,दि.21 : महिला आर्थिक विकास महामंडळा सन 2023-24 ची वार्षिक क्रेडिट प्लॅन कार्यशाळा सोमवार दि. 19 रोजी हॉटेल सेंटर प्लाझा, अकोला येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी क्रेडिट प्लान, अचिवमेंट व नियोजनचे सादरीकरण तसेच विविध विषयावर उपस्थित बँकर्स यांची चर्चा घडवून आणली.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करून प्रेरणा गिताने झाली. त्यानंतर सेमिनार मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बँकेचा सत्कार करण्यात आला. कार्यशाळेत केशव पवार राज्याचे क्रेडिट प्लान, अचिवमेंट व नियोजनचे सादरीकरण केले. श्री. कोकरे यांनी मायक्रो इन्टरप्रिन्युअर लोनची सविस्तर माहिती दिली. जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे यांनी वर्ष 2022-23 चे क्रेडिट प्लॅन व साध्य वर्ष 2023-24 च्या क्रेडिट प्लॅनचे सादरीकरण केले. यामध्ये वर्ष 2022-23 मध्ये 1 हजार 393 गटांना 38 कोटी बँककर्ज गरीब गरजू महिलांना उपलब्ध करुन दिले. तसेच वर्ष 2023-24 मध्ये सर्व बँकेच्या सहकार्याने एसएचजी, जेएलजी आणि वैयक्तिक उद्योगाकरीता महिला लोन असे सर्व घटक मिळून 44 कोटीचे क्रेडिट प्लॅन तयार करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी वर्षा खोब्रागडे यांनी दिली.
या कार्यशाळेला माविमचे उपव्यवस्थापक महेश कोकरे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. तसेच विभागीय संसाधन व्यक्ती केशव पवार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नयन सिन्हा, सारस्वत बँकेचे व्यवस्थापक संदिप तांबे, एचडीएफसी बँकेचे रिजनल हेड देवानंद मोरे, चेतन काळे, आयसीआयसी बँकेचे प्रदिप सांबारे, मनिष गुल्हाने, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सारंग पटले, महादेव वानखडे, बँक ऑफ महाराष्ट्राचे सुनिल इंगळे आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्रिशुला घ्यार यांनी तर आभार प्रदर्शन सहा.संनियंत्रण अधिकारी शरद शिरसाट यांनी केले.