अकोला, दि.19 : भारतीय योग संस्था, दिल्ली यांच्यामार्फत बुधवार दि. 21 जून रोजी नववा आंतरराष्ट्रीय योग दिवस शहरातील विविध ठिकाणी सकाळी सहा ते साडेसात वाजे दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने नागरिकांनी मोठ्या संख्येने आयोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय योग संस्था अकोला कार्यकारणीचे जिल्हा प्रधान राजेंद्र लाडखेडकर यांनी केले आहे.
या ठिकाणी साजरा होणार योग दिवस : जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस वसाहत हॉल निमवाडी अकोला, आरडीजी ज्युनियर अँड सिनियर कॉलेज मुर्तिजापूर रोड अकोला, इन्स्टिट्युट फॉर चार्टर्ड अकाऊंट तोष्णीवाल लेआऊट अकोला, व्हि.एच.बी. गार्डन योग साधना केंद्र गोररक्षण रोड अकोला, रामनगर गार्डन योग साधना केंद्र अकोला व मूकबधिर स्कूल जठारपेठ अकोला येथे योग दिवस साजरा करण्यात येणार आहे.