तेल्हारा :- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर यांनी वंचित बहुजन आघाडीची तेल्हारा शहर कार्यकारणी जाहीर केली आहे यामध्ये समाजातील प्रत्येक घटकांचा समावेश करण्यात आल्याचे दिसून आले. जातपात धर्माच्या पलीकडे जाऊन रक्तदानासारखं महान कार्य करणारे व मानवतावादी दृष्टिकोन ठेवून सर्वांना सहकार्य करणारे शहरातील कुशल संघटक युवा नेतृत्व व सर्वांना सोबत घेऊन चालणारे लखन सोनटक्के( पैलवान) यांची वंचित बहुजन आघाडीच्या तेल्हारा शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तर सामाजिक कार्यकर्ते अँड. शेख नासीर यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तसेच महासचिव पदि प्रवीण पोहोरकार,सूरज वाघमारे, कोषाध्यक्ष पदि भारत सोनटक्के, संघटक,प्रमोद चव्हाण, प्रसिध्दी प्रमुख संघर्ष बोदडे व सदस्य पदी, प्रशांत खाडे, बाबुलाल पोहोरकार,गौतम वानखडे, धीरज वरठे व आकाश जसनपुरे, यांची नियुक्ती करण्यात आली, ते आपल्या नियुक्तीचे श्रेय वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे महासचिव मिलिंद इंगळे तालुका अध्यक्ष अशोक दारोकार माजी शहर अध्यक्ष विकास पवार यांना देतात वंचितच्या शहर कार्यकारणी मध्ये नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी तालुकाध्यक्ष अशोक दारोकार माजी शहराध्यक्ष विकास पवार विजय देशमुख अनंत मानखैर प.स. सदस्य अरविंद तिव्हाणे, बाजार समितीचे संचालक श्याम घोंगे , मो. सलीम, सतीश मामनकर, संजय इंगळे, तेल्हारा विकास मंचचे अध्यक्ष रामभाऊ फ़ाटकर आदी उपस्थित होते.