पुणे : हिमालयापासून मध्यप्रदेशपर्यंत व दक्षिण भारतात धो-धो पाऊस बरसत असताना महाराष्ट्रात मात्र प्रखर उष्णतेची लाट आहे. ही लाट ४ जूनपर्यत राहणार असून त्यापुढे अवकाळी पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मान्सून तब्बल ११ दिवसांनंतर अंदमानातून पुढे सरकला. यंदा त्याचा मुक्काम दरवर्षीपेक्षा तेथे जास्त काळ झाला. आता तो मालदिव बेटांत प्रगती करीत असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. अफगाणिस्तानात १ जूनपासून नवा पश्चिमी चक्रवात तयार होत आहे. त्यामुळे उत्तर भारतातील पाऊस वाढण्याची शक्यता आहे.
या भागात पाऊस ..
उत्तर भारतातील पश्चिमी चक्रवातामुळे हिमालयापासून मध्यप्रदेशपर्यंतच्या भागात मान्सूनपूर्व पाऊस जोरदार सुरू आहे. तसेच केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश किनारपट्टी भागातही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात मात्र तुरळक ठिकाणी पाऊस पडत असला तरीही उष्णतेची लाट कायम आहे.