अकोला,दि.2: पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मंगळवार दि. 9 मे रोजी आयोजित करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यात 270 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. पात्रताधारक इच्छुकांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी केले आहे.
मेळाव्यात सहभागी उद्योजक,पदांचा तपशील व पात्रता निकष याप्रमाणे-
- ॲबेल इलेक्ट्रो सॉप्ट टेक्नोलॉजीस प्रा.लि. अकोला येथे सर्व्हेअर व असिं. सर्व्हेअर पदासाठी प्रत्येकी 50 पदे, शैक्षणिक पात्रता: अनुक्रमे बारावी(विज्ञान)/बीएससी व बारावी/पदवीधर/पदविका (वयोमर्यादा-18 ते 35).
- बजाज इलेक्ट्रीकल्स चाकण पुणे येथे प्रशिक्षणार्थी पदासाठी 35 पदे, शैक्षणिक पात्रता: दहावी/बारावी/पदवीधर/पदविका/आयटीआय(वयोमर्यादा-18ते28).
- अजय पॉली चाकण पुणे येथे प्रशिक्षणार्थी पदासाठी 45 पदे, शैक्षणिक पात्रता: दहावी/बारावी(वयोमर्यादा-18ते28).
- रुचा इंजिनिअरिंग पुणे व औरंगाबाद येथे प्रशिक्षणार्थी पदासाठी 35 पदे, शैक्षणिक पात्रता: दहावी/बारावी/पदवीधर/पदविका/आयटीआय(वयोमर्यादा-18ते28)
- एसआयएसी सीकेएच कॅब पुणे येथे प्रशिक्षणार्थी पदासाठी 25 पदे, शैक्षणिक पात्रता: आयटीआय वेल्डर ट्रेड पास(वयोमर्यादा-18ते28).
- कल्याणी टेक्नोफोर्ज प्रा.लि.कारेगांव पुणे येथे प्रशिक्षणार्थी पदासाठी 30 पदे शैक्षणिक पात्रता: फक्त महिलांसाठी आयटीआय कोणताही ट्रेड (वयोमर्यादा-18ते28).
या प्रमाणे एकूण 270 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
हा रोजगार मेळावा मंगळवार दि.9 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो सह स्वखर्चाने उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0724-2433849 अथवा भ्रमणध्वनी क्रमांक 9665775778 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.