अकोला,दि. 13:- जवाहर नवोदय विद्यालयात वर्ग पाचवीच्या प्रवेश निवड चाचणी परीक्षा शनिवार दि. 29 रोजी होणार आहे. या परीक्षेकरिता जिल्ह्यातील 22 केंद्रावर 5295 विद्यार्थी परीक्षा देणार आहे. ही परीक्षा सी.बी.एस.ई बोर्डामार्फत होणार असून विद्यार्थ्यांनी प्रवेश पत्र डाऊनलोड करुन घ्यावे, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर.एस. चंदनशिव यांनी केले.
परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे प्रवेश पत्र https://cbseitms.rcil.in/nvs/ AdminCard/AdminCard या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावे. एकापेक्षा जास्त वेळा रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन पावती तपासून बरोबर असणाऱ्या नंबरचेच प्रवेश पत्र डाऊनलोड करावे. परीक्षा केंद्रावर दि. 29 रोजी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत केंद्रावर प्रवेश पत्र, विद्यार्थ्यांचे व पालकाचे आधार कार्ड, फोटो कॉपी, काळा किंवा निळा बॉल पाईंट पेन, मास्क इत्यादी साहित्य घेऊन परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. तसेच प्रवेशपत्रावर दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करावे, असे नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर.एस. चंदनशिव यांनी कळविले आहे.