अकोला :- देशसेवेची परंपरा असलेल्या बार्शिटाकळी तालुक्यातील आळंदा येथिल ग्रामदान मंडळाच्या निवडणूकीत मतदारांनी प्रस्थापितांना हादरा देत ग्रामदान मंडळाच्या अध्यक्षपदी माजी सैनिक दत्ता ढोरे तर उपाध्यक्षपदी विश्वनाथ जानोरकार यांना बहुमताने निवडुन दिले आहे. त्यामुळे आता भारतीय सैन्यदलातुन निवृत्त झालेल्या माजी सैनिकांना देशसेवेनंतर आळंदा गावची सेवा करण्याची संधी मिळणार आहे
बार्शिटाकळी तालुक्यातील आळंदा येथिल ग्रामदान मंडळावर गेल्या १५ वर्षांपासून सत्ताधाऱ्याची सत्ता होती परंतु नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय सेवेतुन सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक दत्ता ढोरे यांनी ग्रामदान मंडळावर सत्ता काबीज करुन सत्ताधाऱ्यांना हादरा दिला आहे. ३१ मार्च रोजी घेण्यात आलेल्या ग्रामदान मंडळाच्या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी माजी सैनिक दत्ता ढोरे तसेच निकी डोंगरे तर उपाध्यक्ष पदासाठी विश्वनाथ जानोरकार तसेच डिंगांबर म्हैसने यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते यावेळी घेण्यात आलेल्या निवडणुकीत दत्ता ढोरे यांना ३१५ तर निकी डोंगरे यांना १६६ मते मिळाली तसेच विश्वनाथ जानोरकार यांना ३१७ तर डिंगांबर म्हैसणे यांना १६३ मते मिळाल्याने आळंदा ग्रामदान मंडळाच्या अध्यक्षपदी दत्ता ढोरे तर उपाध्यक्षपदी विश्वनाथ जानोरकार हे निवडून आल्याचे निवडणूक अधिकारी तहसीलदार दिपक बाजड यांनी जाहीर केले.त्यामुळे आता भारतीय सैन्यदलातुन निवृत्त झालेल्या माजी सैनिकांना देशसेवेनंतर आळंदा गावची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. यावेळी विजयी उमेदवारांचे फटाक्यांच्या आतिशबाजीत गावातील रस्त्यावर रांगोळ्या काढून औक्षण करुन मोठ्या हर्षउल्हासात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी निवडनुक अध्याशी अधिकारी तहसीलदार दिपक बाजड हे होते तर त्यांना नायब तहसीलदार वंसत पारसकर, जे जे पवार, प्रमोद ठोंबरे, संतोष कान्हेरकर तसेच कार्यालयीन कर्मचारी, तलाठी कोतवाल आदींनी सहकार्य केले. याप्रसंगी बार्शिटाकळी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सोळके यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंन्दोवस्त होता.