• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, July 2, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पत्रपरिषद: बचतगटांच्या उत्पादनांचे ‘तेजस्विनी’ प्रदर्शन; प्रदर्शनाचा लाभ घेऊन महिला आर्थिक सक्षमीकरणाच्या चळवळीला पाठबळ द्यावे -उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार

Our Media by Our Media
March 22, 2023
in अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राज्य, संपादकीय
Reading Time: 1 min read
84 0
0
पत्रपरिषद
12
SHARES
603
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.22 :- महिला व बाल विकास विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यावतीने जिल्हास्तरावर महिला बचत गटाव्दारे उत्पादीत वस्तूंचे प्रदर्शन व विक्री महोत्सव ‘तेजस्विनी’ चे आयोजन शुक्रवार दि.24 ते रविवार दि.26 दरम्यान स्वराज भवन मैदानावर करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा अकोलेकर नागरिक, महिला तसेच सर्व वयोगटाच्या व्यक्तिंनी घ्यावा व महिला आर्थिक सक्षमीकरणाच्या चळवळीला पाठबळ द्यावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी केले आहे.

तेजस्विनी या प्रदर्शनाच्या आयोजनाबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी श्रीमती वर्षा खोब्रागडे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब व पत्रकार बांधव आदी उपस्थित होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

श्रीमती वर्षा खोब्रागडे यांनी पत्रकारांना माहिती दिली की, प्रदर्शनात जिल्ह्यातील सात तालुक्यातील 80 बचतगट सहभाग घेणार आहेत. महिला व बालविकास विभाग तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरावर शुक्रवार दि. 24 ते रविवार दि. 26 दरम्यान महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन ‘तेजस्विनी’ चे आयोजन करण्यात आले आहे.  अकोला शहरातील स्वराज भवन मैदानावर हे तीन दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.  जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादने या प्रदर्शनात पाहणी व विक्रीसाठी उपलब्ध असतील. जिल्ह्यातील सात तालुक्यातील 80 बचतगट यात सहभाग घेणार असून 50 स्टॉलव्दारे  तीन दिवसांत या उत्पादनांच्या विक्रीतून 12 लाख रुपयांपर्यंतची उलाढाल अपेक्षित आहे. याशिवाय महिलांना उत्पादन, मार्केटिंग, व्यवसायाचे ज्ञान मिळावे यासाठी विविध विषयांतील तज्ज्ञांची व्याख्यानेही आयोजित करण्यात आले आहेत. तसेच मनोरंजनाचे कार्यक्रमही होणार आहेत. अकोला शहर तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी,असे आवाहन  महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी श्रीमती वर्षा खोब्रागडे यांनी केले आहे.

श्री. शेलार म्हणाले की, दि.24 ते दि.26 तीन दिवसांत बचत गटाव्दारे उत्पादित वस्तूंची अधिकाधिक विक्री व्हावी व बचतगट चळवळीला चालना मिळून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला वाव मिळावा, यासाठी हे प्रदर्शन आहे. त्यात वस्तू, पदार्थांची विक्री होणार आहे. हे सर्व पदार्थ कृत्रिम रसायने विरहित घरगुती खाद्यपदार्थ, गृहपयोगी वस्तू, आदिवासींव्दारे उत्पादित आहेत. बहुतांश वस्तू व पदार्थ ह्या घरगुती वापराच्या आहेत. दैनंदिन जीवनात उपयुक्त आहेत. यात कारागिर महिला, सुगरण महिलांच्या कौशल्य व कलाकुसरीचा प्रत्यय येतो. तसेच या तीन दिवसीय कार्यक्रमात तज्ज्ञांची व्याख्याने व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मेजवानी हा लाभ नागरिकांना होणार आहे. तीन दिवशीय प्रदर्शनात नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी केले आहे.

Previous Post

‘तेजस्विनी’ बचतगटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन अकोला येथे शुक्रवार (दि.२४)पासून

Next Post

नेहरू युवा केंद्रातर्फे रालातो महाविद्यालयात पडोस युवा संसद

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
नेहरू युवा

नेहरू युवा केंद्रातर्फे रालातो महाविद्यालयात पडोस युवा संसद

किड्स पॅराडाईजचा

सुमधुर स्वरांनी सजली पाडवा पहाट, स्वर साधना व किड्स पॅराडाईजचा उपक्रम

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.