Satish Kaushik : बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते, कॉमेडियन, स्क्रिप्ट रायटर, दिग्दर्शक आणि निर्माता होते. त्यांचा जन्म 13 एप्रिल रोजी 1956 मध्ये हरियाणा येथे झाला होता. याशिवाय त्यांनी नाटकांमध्ये देखील काम केले आहे.
त्यांना 1987 मध्ये आलेल्या मिस्टर इंडिया या चित्रपटातून ओळख मिळाली. गाण्यातील ‘मेरा नाम है कॅलेंडर’ म्हणत मिस्टर इंडियामध्ये त्यांनी लहान मुलांसह मोठ्यांपर्यंत अजूनही सगळ्यांच्या लक्षात आहे. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांना 1990 च्या रामलखन आणि 1997 च्या साजन चले ससुराल साठी सर्वश्रेष्ठ हास्य अभिनेतेसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. काजोल-अनिल कपूर आणि अनुपम खेर अभिनित ‘हम आपके दिल में रहते है’ सारख्या ब्लॉक बस्टर चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे.
त्यांच्या मृत्यूनंतर अनुपम खेर यांनी विशेष शब्दांत त्यांना श्रद्धांजली दिली आहे. अनुपम खेर यांचे ते खास मित्र होते. अनुपम खेर यांनी लिहिले आहे की, मृत्यू हे या जगातील अंतिम सत्य आहे. मात्र, माझ्या मित्रासाठी मला हे लिहावे लागेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. 45 वर्षांच्या मैत्रिवर असा अचानक पूर्णविराम!!