अकोला, दि. 1 :- राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य विभागाव्दारे जागतिक कर्णबधिर दिनानिमित्त कर्णबधिरता सप्ताह साजरा केला जाणार आहे. हा सप्ताह दि. 1 ते 8 मार्च या कालावधीत राबविले जाणार असून जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जागतिक कर्णबधीरता दिन दरवर्षी दि. 3 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. यावर्षी सन 2023 करिता घोषवाक्य ‘सर्वांसाठी कान आणि ऐकण्याची काळजी! चला ते प्रत्यक्षात आणूया’ (Ear and hearing care for all! Let’s make it a reality) जाहिर केले आहे. त्याअनुषंगाने सप्ताहामध्ये विविध उपक्रमाव्दारे जनजागृती केली जाणार आहे. याकरिता जिल्हास्तरावर नोडल अधिकारी यांना सप्ताह अंमलबजावणीसाठी जबाबदारी देण्यात आली आहे.