अकोला दि.27 :- ज्ञानपीठ विजेते साहित्यीक वि.वा. शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त (दि.२७ फेब्रुवारी) मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. यानिमित्त सोमवार दि.२७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात विदर्भ साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष श्रीमती सीमा शेट्ये रोठे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सोमवार दि.२७ रोजी दुपारी साडेतीन वा. हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी निमा अरोरा, अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मराठी भाषा अधिकारी सदाशिव शेलार हे उपस्थित राहणार असून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे, मराठी भाषा समितीचे अशासकीय सदस्य सुरेश पाचकवडे, श्याम ठक, डॉ. विनय दांदळे, ॲड. मयुर लहाने हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील. ‘कुसुमाग्रजांची प्रेरक जीवनदृष्टी’ या विषयावर श्रीमती शेट्ये आपले विचार व्यक्त करतील. याच कार्यक्रमात मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यात आयोजित विविध कार्यक्रमातील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण होईल. या कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन मराठी भाषा अधिकारी सदाशिव शेलार यांनी केले आहे.