• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, November 28, 2023
26 °c
Akola
26 ° Tue
27 ° Wed
27 ° Thu
27 ° Fri
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आरोग्य विभागाचा उपक्रम; ५० निक्षयमित्रांनी घेतले ६१ क्षयरुग्ण दत्तक

Our Media by Our Media
February 24, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, आरोग्य, ठळक बातम्या, फिचर्ड
Reading Time: 1 min read
84 0
0
TB
12
SHARES
603
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२४ :- उपचाराधीन क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांना दरमहा कोरड्या आहाराचे पोषण किट पुरवून देशातून क्षयरोग हद्दपार करण्यात योगदान द्यावयाचे आहे. त्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ‘निक्षयमित्र’ हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ५० निक्षयमित्रांनी ६१ क्षयरुग्णांना दत्तक घेतले आहे, विशेष म्हणजे यात आरोग्य विभाग व प्रशासनातील अधिकाऱ्यांचा सहभाग आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनिष शर्मा यांनी दिली.

काय आहे निक्षयमित्र संकल्पना?

हेही वाचा

आजपासून 3 दिवस मोठ्या पावसाचा अंदाज

अमरावती – कुरणखेड – शेळद महामार्गाचे लोकार्पण जिल्ह्यात महत्वाच्या पुलांसाठी तीनशे कोटींचा निधी

क्षयरुग्णांना ‘सामुदायिक सहाय्य’ हा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचा उपक्रम आहे. याद्वारे क्षयरुग्णांना अतिरिक्त सहाय्य मिळते. समाजातील व्यक्ती, सामाजिक व सेवाभावी संस्था, व्यावसायिक संस्था , लोकप्रतिनिधी इ.यात सामाजिक उत्तरदायित्व म्हणून यात सहभागी होऊ शकतात. या उपक्रमाचा प्रारंभ राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी केला आहे. ह्या निक्षयमित्रांनी क्षयरुग्णांना सहा महिने ते तीन वर्षे कालावधीसाठी  कोरडा आहार (निक्षय पोषण किट) पुरवायचे आहे.

जिल्ह्यातील अधिकारी- कर्मचारी झालेत निक्षयमित्र

विशेष म्हणजे अकोला जिल्ह्यातील प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी हे सुद्धा या उपक्रमात सहभागी झाले आहेत. जिल्ह्यात ६१ क्षयरुग्णांना ५० जणांनी निक्षयमित्र होऊन दत्तक घेतले आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. तरंगतुषार वारे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कापशी येथील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले ह्यांनी अकोट येथील, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. करंजीकर यांनी  बाळापूर येथील, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनिष शर्मा यांनी बार्शीटाकळी येथील,  बोरगाव उपकेंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अलका बोराडे यांनी  बोरगाव खु. येथील रुग्णास दत्तक घेतले असून  ते आता ‘निक्षयमित्र’ बनले आहेत. त्याच प्रमाणे आरोग्य संजिवनी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या संस्थेनेही क्षयरुग्णांना दत्तक घेतले आहे.

क्षयरुग्णांसाठी पोषण आहार किट

निक्षयमित्रांनी क्षयरुग्णांना मोठ्या व्यक्तिकरीता- नाचणी/बाजरी/ ज्वारी/ गहू- ३ किलो, डाळ- दीड किलो,  तेल-२५० ग्रॅम, शेंगदाणा/ दुधपावडर १ किलो तर लहान बालकांना- नाचणी/बाजरी/ ज्वारी/ गहू- २ किलो, डाळ- १ किलो,  तेल-१५० ग्रॅम, शेंगदाणा/ दुधपावडर ७५० ग्रॅम याप्रमाणे पोषण आहार किट दरमहा द्यावयाचे आहे. या पोषण आहाराचे उद्दिष्ट रुग्णाचे पोषण योग्य पद्धतीने होऊन त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे हा होय. औषधोपचार सर्व शासकीय दवाखान्यांत मोफत असतातच.

जिल्ह्यातील क्षयरुग्ण संख्या

अकोला जिल्ह्यात एकूण  १३५८ जणांची क्षयरुग्ण म्हणून नोंद आहे. त्यापैकी ७८९ जणांचे उपचार पूर्ण होऊन ते आता बरे झाले आहेत. सद्यस्थितीत  ५६९ जणांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी ४१० रुग्णांनी पोषण आहार किट घेण्यास संमति दर्शविली आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनिष शर्मा यांनी दिली आहे.

निक्षयमित्र होण्यासाठी काय करावे?

जिल्ह्यातील अधिकाधिक व्यक्ति, संस्थांनी निक्षयमित्र व्हावे, असे आवाहन उपसंचालक डॉ. तरंगतुषार वारे यांनी केले आहे. त्यासाठी https://communitysupport.nikshay.in/ या लिंकवर जाऊन माहिती घ्यावी अथवा डॉ. मनिष शर्मा, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा स्त्री रुग्णालयामागील परिसर, अकोला. संपर्क क्रमांक-८४२१०८५३६८ यांच्याशी संपर्क साधावा.

Previous Post

निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण

Next Post

RBI ची ‘या’ बँकांवर मोठी कारवाई, महाराष्ट्रातील २ बँकांचा समावेश, पैसे काढण्यावर घातली मर्यादा

RelatedPosts

bad-weather
Featured

आजपासून 3 दिवस मोठ्या पावसाचा अंदाज

November 24, 2023
अमरावती – कुरणखेड – शेळद महामार्गाचे लोकार्पण जिल्ह्यात महत्वाच्या पुलांसाठी तीनशे कोटींचा निधी
Featured

अमरावती – कुरणखेड – शेळद महामार्गाचे लोकार्पण जिल्ह्यात महत्वाच्या पुलांसाठी तीनशे कोटींचा निधी

November 23, 2023
जिल्ह्यात ‘विकसीत भारत संकल्प यात्रेचा’  शुभारंभ
Featured

जिल्ह्यात ‘विकसीत भारत संकल्प यात्रेचा’ शुभारंभ

November 23, 2023
सुप्रिम
Featured

स्‍पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आई-वडिलांच्‍या दबावामुळेच जीवन संपवतात : सर्वोच्‍च न्‍यायालयाची टिप्‍पणी

November 21, 2023
शेतकऱ्याला
Featured

शेतजमीन असलेल्या मातंग समाजाच्या व्यक्तींनी माहिती सादर करण्याचे आवाहन

November 21, 2023
राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे गुरूवारी लोकार्पण
Featured

राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे गुरूवारी लोकार्पण

November 21, 2023
Next Post
rbi

RBI ची 'या' बँकांवर मोठी कारवाई, महाराष्ट्रातील २ बँकांचा समावेश, पैसे काढण्यावर घातली मर्यादा

journalists

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२२ साठी मुदतवाढ; दि.८ मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

bad-weather

आजपासून 3 दिवस मोठ्या पावसाचा अंदाज

November 24, 2023
जिल्ह्यात ‘विकसीत भारत संकल्प यात्रेचा’  शुभारंभ

जिल्ह्यात ‘विकसीत भारत संकल्प यात्रेचा’ शुभारंभ

November 23, 2023
अमरावती – कुरणखेड – शेळद महामार्गाचे लोकार्पण जिल्ह्यात महत्वाच्या पुलांसाठी तीनशे कोटींचा निधी

अमरावती – कुरणखेड – शेळद महामार्गाचे लोकार्पण जिल्ह्यात महत्वाच्या पुलांसाठी तीनशे कोटींचा निधी

November 23, 2023
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

Verified by MonsterInsights