अकोला,दि.२० :- रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी तालुकानिहाय मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षक यांची नियुक्ती करुन त्यांचेवर समुपदेशन, तपासणी, उपाययोजना याबाबत जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी कळविले आहे.
अकोला तालुका- हेमंत खराबे, मुर्तिजापूर- श्रीमती योगिता राणे, बाळापूर- प्रफुल्ल मेश्राम, बार्शी टाकळी व पातुर- संदीप तुरकणे, अकोट- गजानन दराडे, तेल्हारा- अभिजीत टाले याप्रमाणे. या मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षक यांच्या पथकाने नेमून दिलेल्या तालुक्यात रस्ता सुरक्षा समुपदेशन करणे, रस्ता सुरक्षा तपासणी मोहिम राबविणे, वारंवार अपघात होणारी स्थळे निश्चित करणे, अपघाताची कारणे शोधणे, त्यावर दीर्घ कालीन उपाययोजना सुचविणे, राबविणे इ. कामे करावयाची आहेत, असे श्रीमती दुतोंडे यांनी कळविले आहे.