अकोटः सातपुडा पायथ्याशी असलेल्या अकोट नगरीतील अनुप गोरे या युवकांने स्वतः मधील कलागुणांना वाव देेत सिनेक्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या “जग्गु आणि ज्युलिएट”.
या दिग्गज कलावंत असणाऱ्या चित्रपटाचा तो कार्यकारी निर्माता बनला आहे. अकोट येथे लहानाचा मोठा झालेला आणि येथूनच आपले शिक्षण पूर्ण करून मुंबईमध्ये जाऊन आपल्या गावाचे नाव मोठे करणारा अकोटचा सुपुत्र अनुप अशोक गोरे याने मराठी चित्रपटसृष्टीत १३ वर्षापासून कार्यरत आहे.
चित्रपट दुनियेत नाव कमावणारा हरकुन्नरी कलावंत आजपर्यंत चित्रपटाचा कार्यकारी निर्माता, डीजीटल कोआॅरडीनेटर पी आर अॅन्ड मार्केटींग अशा सर्वच पैलूंचा अनुभवाव्दारे आपले अस्तित्व स्वबळावर निर्माण करणारा अनुप गोरे ज्याने सन २०१५ ला शेगांवचा योगी गजानन कृपेनेच आजवर जवळपास ५३ मराठी चित्रपटाच्या कामाचा टप्पा गाठला आहे.
यामध्ये मुकशी पॅटर्न, सर सेनापती हंबीरराव, धर्मवीर, एकदा काय झाले मीडीयम स्पायसी या सारखे सुपर हीट चित्रपट आहेत. इतके असूनही या चित्रपट कलावंताच्या संगतीने राहून ही स्वभावातील गुण कायम राखले आहेत जे वाखण्या सारखे आहेत. मुंबई या मायानगरीत राहून चित्रपट दुनीयेत स्वत:चे अस्तीत्व निर्माण करीत लवकरच प्रदर्शित होणाऱ्या “जग्गु आणि ज्युलिएट” या दिग्गज कलावंत असणाऱ्या चित्रपटाचा कार्यकारी निर्माता म्हणुन अनुप गोरे यांनी काम बघीतले आहे.