अकोला : बाळापूर तालुक्यातील अंत्री मलकापूर येथील स्वयंभू महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव धुमधडाक्यात सुरू झाला आहे. देवाधिदेव महादेव आणि सती मातेची प्रेमकथा ऐकण्यासाठी भाविक गर्दी करीत असून आकर्षक रोषणाईने मंदिराचा परिसर उजळून निघाला आहे.
महाशिवरात्री निमीत्त आकर्षक रोषणाई व देवाधीदेव महादेव व सती माता ची भव्य प्रेमकथा डिजिटल स्क्रीन वर 8 तारीख पासून सायंकाळी 8 ते 10 पर्यंत सुरू आहे. सर्वांनी या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचा लाभ घ्यावा तसेच महादेव संस्थान , भारत एक कदम व स्वामी विवेकानंद ग्रूप तर्फे स्पर्धा परीक्षा वाचनालय उद्घाटन 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता होणार आहे.तसेच पुढील युवा संमेलन बाबत सविस्तर रूपरेषा ठरणार आहे. (स्वयंभू महादेव मंदिरात)
महाशिवरात्री निमित्त आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन होणार आहे . 19 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर हभप अरुण महाराज सावंत यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर दुपारी 12 ते 3 या कालावधीत महाप्रसाद व गोपालकाल्याचा लाभ भाविकांना घेता येईल.तरी सर्व पंच क्रोशितील भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष इंजी. अरविंद देठे आणि विश्वस्त मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.