• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘जागरुक पालक- सुदृढ बालक’ :सर्व यंत्रणांनी समन्वयाने अभियान राबवावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा ; जिल्हाभरात ५ लाख ७० हजार ९४९ बालकांच्या आरोग्य तपासणीचे नियोजन

Our Media by Our Media
February 8, 2023
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, आरोग्य, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राज्य
Reading Time: 1 min read
82 1
0
NIma Arora
12
SHARES
596
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि. ८:- ‘जागरुक पालक- सुदृढ बालक’ अभियानास गुरुवार दि.९ पासून सुरुवात होत आहेत. या अभियानात ० ते १८ वर्षाच्या शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होणार आहे. सर्व सहभागी यंत्रणांनी परस्पर समन्वय राखावा व अभियान राबवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज दिले. या अभियानात ५६ दिवसांत १७६ आरोग्य पथके ५ लाख ७० हजार ९४९ बालकांची म्हणजेच दररोज  प्रत्येक पथक १५० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करेल, असे नियोजन करण्यात आले असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

‘जागरुक पालक- सुदृढ बालक’ अभियानाच्या पूर्वतयारीचा आढावा आज नियोजन भवनातील बैठकीत घेण्यात आला.बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, आरोग्य उपसंचालक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, महिला बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ) डॉ. वैशाली ठक, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय चिमणकर, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल, डॉ. मनिष शर्मा, डॉ. सीमा तायडे, डॉ. विशाल काळे, डॉ. आश्विनी खडसे, तसेच सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

१७६ पथके,३६०८ शाळा, ५ लाख ७० हजार ९४९ विद्यार्थी

जिल्ह्यातील ग्रामिण व शहरी भागातील शून्य ते १८ वर्षे वयोगटातील  बालकांची आरोग्य तपासणी, संदर्भसेवा, प्रयोगशाळा तपासण्या व आवश्यकतेनुसार उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. आरोग्य तपासणी, उपचारांसोबत प्रतिबंधात्मक  आरोग्य सुविधा, समुपदेशन आदी सुविधा देण्यात येणार आहे. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी ५६ दिवसांचा कालावधी आहे. त्यासाठी राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाची १९, सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांची  १२५, नागरी आरोग्य केंद्रांची १२, आरोग्य उपकेंद्रांची २० अशी एकूण १७६ पथके तयार करण्यात आली आहेत. शासकीय अंगवाडी, बालवाडी, खाजगी नर्सरी, शाळा, शाळा बाह्य विद्यार्थी, बालगृहे, दिव्यांगांच्या शाळा अशा एकूण ३६०८ शाळा-संस्थांमध्ये या तपासण्या होतील. त्यात एकूण ५ लाख ७० हजार ९४९ विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचे नियोजन आहे. प्रत्येक पथकाने एका दिवसात किमान १५० बालकांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे उद्दिष्ट्य आहे. या सर्व पथकांसमवेत आशा व अंगणवाडी सेविकाही सहभागी असतील.

तपासणी ते उपचाराचे नियोजन

प्रथमस्तर तपासणीत वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एलएचव्ही, आरोग्य सहायक यांच्यास्तरावर तपासणी होईल.आवश्यकता भासल्यास दुसऱ्यास्तरावर  वैद्यकीय अधीक्षक, बालरोग तज्ज्ञ, भिषक, स्त्रीरोग तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, नेत्र शल्यचिकित्सक, नेत्र चिकित्सा अधिकारी, दंतरोग तज्ज्ञ यांच्या स्तरावर तपासण्या व उपचार होतील. पुढील टप्प्यात आवश्यकता भासल्यास बालकास संदर्भसेवा, उच्चस्तरीय उपचार व शस्त्रक्रिया इ. सेवा दिल्या जातील.

अशा होतील तपासण्या

या अभियानात बालकाची संपूर्ण आरोग्य तपासणी होईल. वजन उंची नुसार बालकाची सुदृढता मोजली जाईल, जन्मजात व्यंग असल्यास ते तपासणे, रक्तक्षय, डोळ्यांचे आजार, गलगंड, स्वच्छ मुख अभियान, दंतविकार, हृदयरोग, क्षयरोग, कुष्ठरोग, कॅन्सर, अस्थमा, एपिलेप्सि इ. आजारांचे संशयित रुग्ण ओळखून त्यांना संदर्भित केले जाईल. याशिवाय ऑटीझम, विकासात्मक विलंब  इ. मानसिक स्वरुपाच्या आजारांवरही उपचार केले जातील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Previous Post

निकामी साहित्याचा जाहीर लिलाव

Next Post

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज आमंत्रित; 20 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
Chhatrapati State Sports Awards

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज आमंत्रित; 20 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

Eklavya

जवाहर नवोदय विद्यालय; निवड चाचणी परीक्षाकरिता 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.