अकोला,दि. 4 :- जिल्ह्यातील चर्मोद्योग व्यवसाय करणाऱ्या गटई कामगांराना 100 टक्के अनुदानावर पत्र्यांचे स्टॉल वाटप करण्यासाठी बुधवार दि. 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त डॉ.अनिता राठोड यांनी केले.
अटीशर्ती याप्रमाणे : अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी व अनुसूचित जातीचा असावा. अर्जदाराच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 40 हजार रुपये व शहरी भागासाठी 50 हजार रुपयापेक्षा अधिक नसावे.(यासाठी तहसिलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला आवश्यक राहिल), अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे, अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, छावणी बोर्ड(कॅन्टॉन्मेंट बोर्ड) किंवा महानगर पालिका यांनी त्यास भाडयाने, कराराने, खरेदीने अगर मोफत परंतु अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावा किंवा ती त्याच्या स्वयंमालकीची असावी.
अर्जाचे नमुने विनामुल्य सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,अकोला येथून मिळतील. तसेच ज्या लाभार्थ्यांनी या पुर्वी योजनेच्या लाभ घेतला आहे अशा लाभार्थ्यांनी दुबार अर्ज करुन नये. अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, निमवाडी अकोला येथे संपर्क साधावा.