अकोला,दि. 1 : – जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय व ग्रामीण रुग्णालय, अकोट यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 31 जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालय, अकोट येथे महाआरोग्य तणाव मुक्त शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध जनजागृतीपर कार्यक्रमाव्दारे मानसिक आजारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
महाआरोग्य तणाव मुक्त शिबिराचे उद्घाटन उपसंचालक तथा जिल्हा शल्य चिकित्स्क डॉ. तरंगतुषार वारे यांनी केले. यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. मिनल पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्वेता सालफळे, मानसोपचार तज्ञ डॉ. हर्षल चांडक, डॉ राम बिहाडे, डॉ. मंगेश दातीर, डॉ. राजेश इंगळे, सर्वेश बोचे, ॲड. शुभांगी ठाकरे आदि उपस्थित होते.
तणाव मुक्त जिवन जगण्याकरीता निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे, गीत गायन, छंद जोपासणे, आनंदी राहणे, इतरासोबत मनमोकळेपणाने बोलणे इत्यादी बाबीमुळे तणावमुक्त राहण्यास मदत होते. तसेच तणाव मुक्त कसे राहावे याबाबत डॉ.तरंगतुषार वारे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम, मौखिक आरोग्य कार्यक्रम, सर्कस आहार, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, कुष्ठरोग्य निर्मुलन कार्यक्रम, कुटुंब कल्याण कार्यक्रम, पीसीपीएनडीटी इत्यादी कार्यक्रमाचे स्ट्रॉल लावून जनजागृती करण्यात आले.
शिबीरामध्ये 824 रूग्णांची तपासणी
शिबीर कार्यक्रमात एकुण 720 रूग्णांची तपासणी करण्यात आले. यामध्ये मानसिक आरोग्य विभागाचे 65, अससंर्गजन्य आजार विभागाचे 55, दंतरोग 37, स्त्रीरोग 51, बालरोग 77, मेडिसिन विभागातील 123, नेत्र रूग्ण 112, अस्थिरोग 95, त्वचा विभाग 56, आयुष विभाग 48, राबास्वाका 43 व इतर इतर रुग्णांची तपासणी करुन औषधपचार व समुपदेशन करण्यात आले. तसेच शिबीरांमध्ये 50 आभा कार्ड व 12 गोल्डन कार्ड तयार करुन देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हर्षल चांडक यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैद्यकीय अधिकारी डॉ. गुजर तर आभार प्रदर्शन आरोग्य सेवक श्री. जंवजाळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदिप इंगोले,संदिप घाटोळ, अशोक जाधव, सोपान अंभोरे, सय्यद आरीफ, प्रतिभा तिवाणे, रिना चोंडकर, कविता रिठ्ठे, गायत्री सिंधी, ज्ञानेश्वर भेंडेकर, कपिल शिसरसाट, अधिकारी, कर्मचारी आशा स्वयंमसेविका यांनी परिश्रम घेतले.