वाडेगाव (प्रतिनिधी) -: प्रजासत्ताक दिनानिमित्त वाडेगाव येथे समस्त मुस्लीम समाज वाडेगाव द्वारा राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रम चे भव्य आयोजन करण्यात आले होते.राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रमात राजेश पाटिल ताले व स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन च्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव आयोजन समितीकडून करण्यात आला.
बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन बाप्पू देशमुख,विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन अकोला जिल्हाभर करीत असलेले शैक्षणिक व सामाजिक कार्य हे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याचे सांगितले. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात एक वेगळा पायंडा निर्माण करून अकोला जिल्ह्याच नाव पूर्ण महाराष्ट्रभर करण्याचं कार्य स्वामी विवेकानंद ग्रुप करीत असल्याचे उदगार अमोलदादा मिटकरी व नितीनबाप्पू देशमुख यांनी काढले.
राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष युवाव्याख्याते राजेश पाटिल ताले यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी युवकांची भूमिका खूप महत्त्वाची असल्याचे सांगितले. आपल्याला उद्याचा सृजनशील भारतीय समाज घडविण्यासाठी आजच्या युवापिढीमध्ये महापुरुषांचे विचार पेरण्याची गरज आहे,महापुरुषांचे विचार अंगीकारून उद्याच्या सृजनशील समाजाची निर्मिती करण्याची ताकद युवकांमध्ये आहे असे राजेश पाटिल ताले यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मौलाना मतीन उररेहमान (अमरावती), कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून मा.श्री.नितीन बाप्पू देशमुख (आमदार:-बाळापूर विधानसभा मतदारसंघ),मा. श्री. नतिकोद्दीन खतीब (माजी आमदार बाळापूर), प्रमुख वक्ते म्हणून मा. श्री. अमोल मिटकरी (आमदार :-विधानपरिषद), राजेश पाटिल ताले (अध्यक्ष :-स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन), मौलाना हारून नदवी साहेब(जळगाव खान्देश) तसेच प्रमुख अतिथी म्हणून ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जावरकर,पूज्य भंते चंद्रमणी(इंदिरा नगर:- वाडेगाव) उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी वाडेगाव परिसरातील हिंदू-मुस्लिम नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.