अकोला दि.25 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73 व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय समारंभ लाल बहादूर शास्त्री स्टेडीयम अकोला येथे गुरुवार दि. 26 रोजी सकाळी सव्वा नऊ वा. होणार आहे.
जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन होणार आहे. सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मुख्य शासकीय समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.