अकोला, दि.20 :- अकोला परिमंडळासाठी समुदाय आरोग्य अधिकारी या पदासाठी होणारी प्रवेश परीक्षा ही रविवार दि.२२ रोजी अकोला येथे होणार आहे. संबंधित उमेदवारांचे प्रवेश पत्र हे शासनाच्या आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत, असे अकोला मंडळ उपसंचालक आरोग्य डॉ. तरंगतुषार वारे यांनी कळविले आहे.
यासंदर्भात उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ यांच्या कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत अकोला परिमंडळासाठी समुदाय आरोग्य अधिकारी या पदाकरीता राज्यस्तरावरुन दि.१२ डिसेंबर २०२२ रोजी जाहिरात देण्यात आली होती. दि.२० डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज स्विकृतीची मुदत होती. या पदासाठी अकोल परिमंडळासाठी बरेच अर्ज प्राप्त झाले. अर्जांची छाननी झाली असून रविवार दि.२२ जानेवारी २०२३ रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी पात्र उमेदवारांचे प्रवेश पत्र https://arogya.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले आहेत. अकोला मंडळासाठी परीक्षा ही अकोला येथे खालील परीक्षा केंद्रांवर होणार आहे.
परीक्षा केंद्र याप्रमाणे-
१) अकोला/ अमरावती/ यवतमाळ जिल्ह्यांसाठी श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय, रतनलाल प्लॉट, अकोला.
२) बुलडाणा जिल्ह्याकरीता- श्री. शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिवाजी पार्क, अकोला.
३) वाशीम जिल्ह्याकरीता- न्यू इंग्लिश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, रामदास पेठ पोलीस स्टेशन जवळ, अकोला.