अकोला दि. 13 :- जिजाऊ माँसाहेब, स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात आयोजित कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार व बाबासाहेब गाडवे यांनी जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, माता व बाल संगोपण अधिकारी डॉ. चिमणकर, डॉ. मनिष शर्मा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, तहसिलदार शिल्पा बोबडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.