अकोला, दि. 12 :- प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्रेतांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्याअनुषंगाने शहरातील विविध ठिकाणी धडक मोहिमे राबवून मांजा विक्रेतांवर कारवाई करण्यात येत आहे. मोहिमे अंतर्गत आज दुसरी मोठी कारवाई भगतवाडी, अकोला येथे धाड टाकून 50 किलो प्रतिबंधीत नायलॉन मांजा जप्त करुन पाच हजार रुपये दंड वसूल करुन कारवाई करण्यात आली.
ही कारवाई जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदुषण नियंत्रण मंडळ व अनंतनंदाई सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था यांच्या पथकाव्दारे राबविण्यात आली. यामध्ये पोलिस विभागाचे संजय पारस्कर, बाबुराव देशमुख तसेच अमोल सोनोने, परेश धुमाळे, श्याम क्षिरसागर, राज मोरवाल, कल्पेश देशमुख व डाबकी रोड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शिरीष खंडारे यांचे सहकार्य लाभले.