पातुर (सुनिल गाडगे) : पत्रकार दिनाचे औचित्य साधून पातुरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथे लेखणीच्या शिलेदारांचा सन्मान सोहळा पार पडला.
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्त पातुर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथे पत्रकार बांधवांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा पत्रकार संघांचे पातुर तालुका अध्यक्ष अ. शेख कुददुस भाई हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार मोहन जोशी, उमेश देशमुख, संजय गोतरकर, देवानंद गहीले निशांत गवई,प्रदीप काळपांडे, , सतिष सरोदे, संगीता इंगळे, किरणकुमार निमकंडे, राम वाढी, अविनाश पोहरे, स्वप्नील सुरवाडे, प्रमोद काढोणे, निखिल इंगळे, सचिन वानखडे, जयवंत पुरुषोत्तम आदी. पत्रकार बांधवाचा सत्कार यावेळी करण्यात आला .
किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे, कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. गोपाल गाडगे यांनी आपल्या प्रास्ताविक मधून कार्यक्रमाची रूपरेषा विषद केली. तद्नंतर जेष्ठ पत्रकार उमेश देशमुख, देवानंद गहिले, प्रदीप काळपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी पत्रकार दिनाचे महत्व आपल्या भाषणातून विषद केले. संचालन गौरी इंगळे व सेजल राऊत यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नरेंद्र बोरकर, नितु ढोणे, पल्लवी पाठक, अविनाश पाटील, पल्लवी खंडारे, वंदना पोहरे, अश्विनी अंभोरे, शीतल कवडकर, लक्ष्मी निमकाळे, भारती निमकाळे, योगिता देवकर, नयना हाडके , प्रियंका चव्हाण, हरिष सौंदळे, बजरंग भुजबटराव, कल्पना इंगळे, रुपाली पोहरे, शुभम पोहरे आदींनी परिश्रम घेतले.