तेल्हारा -: स्थानिक डॉ गोपाळराव खेडकर महाविद्यालयात गृहअर्थशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्ञानपीठ नगर परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा क्र.१ ला बी. ए.भाग- ३ च्या विद्यार्थीनी भेट दिली.
यावेळी गृहअर्थशास्त्र विभागाच्या वतीने वर्ग १ ते ४ च्या विद्यार्थ्यांना आहार कसा घ्यावा, आहारात कोणकोणते पदार्थ असावेत,व्यक्तिगत स्वछता कसी राखावी आदी संदर्भात माहिती दिली. विद्यार्थ्यांची उंची व वजन मोजण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना क्राफ्टचे प्रात्यक्षिक करून दाखविले. या उपक्रमासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्ञानपीठाचे मुख्याध्यापक दीपक कोपरे, शिक्षक सरिता देशमुख, प्रणिता बोंद्रे, भावना निघोट यांनी सहकार्य केले. या उपक्रमाचे आयोजन गृहअर्थशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख प्रा.एस.जे. फरसोले यांनी बी. ए.भाग-३ च्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गोपाल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.