अकोला,दि.21:- औाद्योगिक प्रशिक्षण संस्था, बाळापूर जि. अकोला येथील प्रशिक्षणाअंतर्गत वापर करुन वापरण्यायोग्य नसलेले निकामी झालेले हत्यारे, अवजारे व इत्तर साहित्याचा जाहीर लिलाव गुरुवार दि. 29 डिसेंबर रोजी होणार आहे.
तसेच साहित्याची यादी 100 रुपये रोख भरुन कार्यालयीन वेळेत उपलब्ध करुन देण्यात येईल. निविदेतील सर्व हक्क शासकीय औद्योगिक प्रशिक्षणा संस्था, बाळापूर यांना राहिल. लिलावाबाबतच्या अटी व शर्ती औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बाळापूर येथे उपलब्ध आहे, अशी माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे(मुलींचे) प्राचार्य एस.आर. ठोकरे यांनी दिली आहे.