तेल्हारा- तेल्हारा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तेल्हारा द्वारा तालुक्यात 12 ते 16 डिसेंबर दरम्यान स्कूल कनेक्ट सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताह मध्ये विवीध विद्यालयात सेमिनार चे आयोजन करून वर्ग ८ ते १० च्या विद्यार्थ्यांमध्ये तंत्र शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व व्यावसायिकभिमुख शिक्षणाची माहिती देण्याकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तेल्हारा द्वारे स्कूल कनेक्ट सप्ताह निमित्ताने सेमिनार चे आयोजन तेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथील विवेक वर्धिनी विद्यालय व मनब्दा येथील श्रीनाथ विद्यालय याठिकाणी करण्यात आले .यावेळी तंत्र शिक्षण व आय टी आय कोर्स बद्दल माहिती देण्यात आली व आय टी आय प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर रोजगाराचा असलेल्या विविध संधी याबाबत शिल्पनिदेशक घावट यांनी तंत्र शिक्षण याबद्दल माहिती दिली.
तसेच शिल्पनिदेशक बुरुकुल यांनी मुलींनी सुद्धा तंत्र शिक्षणाकडे वळून स्वयंरोजगार व शासकीय नौकरी मिळवून संधीचे सोने करावे असे आवाहन केले यावेळी भांडरपाल कुंमखिले , शिल्पनीदेशक सचिन थाटे यांनी सुद्धा आय टी आय बद्दल माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्याचबरोबर या स्कूल कनेक्ट सप्ताह द्वारा तालुक्यातील विविध विद्यालयात कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य ए. एस .सोळंके यांनी दिली आहे.