अकोला,दि.८ :- महिलांवर होणाऱ्या हिंसेविरुद्ध जनजागृती व्हावी यासाठी दि.२५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत महिला हिंसा विरोधी पंधरवाडा राबविण्यात येतो. यानिमित्त आज बहुजन हिताय सोसायटी तर्फे पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी हा प्रयोग सादर केला.
निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय ठाकरे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, कार्यक्रम समन्वयक सारिका वानखडे, प्रा. भोवते, आर.जे. गौरव, कवी गोविंद पोलाड तसेच महाविद्यालयाचे अध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.