अकोला,दि. 6 :- राज्यात 26 नोव्हेंबर हा ‘संविधान दिन’ आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरीनिर्वाणदिन’ 6 डिसेंबर या कालावधीत ‘समता पर्व’ साजरे होत आहे. याचाच एक भाग म्हणून सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत येथील मागासवर्गीय मुलामुलींच्या शासकीय वसतीगृहात समता पर्वांतर्गत सोमवार दि. 5 डिसेंबर रोजी व्याख्यान व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली.
मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांकरीता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन करण्यात आले. यावेळी लोकसेवा करीयर ॲकेडमीचे संचालक गजानन वाकोडे व विक्री कर अधिकारी स्वाती मार्के यांनी स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुजाता रायबोले यांनी केले.
मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांकरीता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नागरिकांचे हक्क व कर्तव्य या विषयावर विशाल गवळी यांनी व्याख्यान दिले. यामध्ये संविधानाने बहाल केलेले हक्क, अधिकार व कर्तव्य याबाबत मार्गदर्शन केले. तसेच कुणाल मेश्राम व त्यांचे कलावंतानी पट्यनाट्यव्दारे जनजागृतीपर कार्यक्रम केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डि.बी. बोथिंगे, मुख्याध्यापक श्रीमती माळी, सामाजिक कार्यकर्ता मनिराम टाले, श्रीनिवासी उइके व कुणाल मेश्राम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीकांत वाहुरवाघ यांनी केले. यावेळी वसतीगृहातील कर्मचारी, विद्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते.