अकोला,दि. 6 :- अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या वतीने ग्राहक व जनजागृती व प्रबोधनाकरीता चित्ररथ व गाहक जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ग्राहक जागृती चित्ररथास आज जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसर अकोला येथून जिल्हा व सत्र न्यायाधिस सुवर्णा केवले यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
संकल्प साधना संस्था, अकोला मार्फत शहरी व ग्रामीण भागात चित्ररथाव्दारे जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्हा ग्राहक मंच वकील संघटनेचे अध्यक्ष एस. एस. कुळकर्णी व जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष एस.एस. उंटवाले यांनी ग्राहक जनजागृतीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे प्रबंधक सुनिल मराठे, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव योगेश पैठणकर, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्य एस.एम. आळशी, बार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत वानखडे, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु. काळे, नॅशनलिस्ट कंझ्युमर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय पाठक, विदर्भ महिला अध्यक्ष श्रीमती टीना, उपाध्यक्ष संगीता नानोटे यांची उपस्थिती होते.