अकोला,दि. 5 :- राज्यात २६ नोव्हेंबर हा ‘संविधान दिन’ आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरीनिर्वाणदिन’ ६ डिसेंबर या कालावधीत ‘समता पर्व’ साजरे होत आहे. याचाच एक भाग म्हणून सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहात समता पर्वांतर्गत प्रश्न मंजुषा व गीत गायन स्पर्धेसह विविध कार्यक्रम राबविण्यात आले.
गुरुवारी दि.1 डिसेंबर रोजी संविधानावर आधारीत प्रश्न मंजुषा घेण्यात आली. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. शुक्रवार दि. 2 डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व संविधानावर आधारित गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये पायल टाले या विद्यार्थ्यांनी पहिला क्रमांक मिळविला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसतीगृहाच्या गृहपाल ए.पी.चेडे तर बार्टीच्या समता दूत वैशाली गवई उपस्थित होते. तसेच शनिवार दि. 3 डिसेंबर रोजी वसतीगृहामध्ये पालक सभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रवेशीत मुलांच्या पालकांशी संवाद साधण्यात आले. तसेच वसतीगृहात देण्यात येणाऱ्या सुविधाविषयी माहिती देण्यात आले. यावेळी वसतीगृहातील कर्मचारी, विद्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते.