तेल्हारा – मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिना निमित्त 3 डिसेंबर रोजी ग्रामीण रूग्णालय तेल्हारा येथे तालुक्यातील पत्रकार व कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
मराठी पत्रकार परिषदेच्या 83 व्या वर्धापन दिना निमित्त राज्यभरात पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी केले त्यानुसार तेल्हारा तालुक्यात सुद्धा परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रूग्णालय तेल्हारा येथे पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पेदाम, वैद्यकीय अधिकारी डॉ. मल्ल, डॉ खोडके, डॉ. कर्दळे मॅडम,डॉ.राजश्री डोंगरदिवे, डॉ. इंगळे, डॉ.करोडे, सहायक निखिल वरेकर, कोकाटे,नन्ने, परिचारिका रिना डाबेराव, पल्लवी बगाडे,भाग्यश्री अस्वार, किरण गिते,मयुरी पाथ्रीकर,विशाखा सिरसाट, पाथ्रीकर आदी तज्ञ मंडळींनी पत्रकारांची विविध उपचार तपासणी केली. यावेळी तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रल्हादराव ठोकणे,सुरेश शिंगणारे, सत्यशील सावरकर, अनंतराव अहेरकर, रामभाऊ फाटकर, सदानंद खारोडे, धर्मेश चौधरी, प्रशांत विखे, निलेश जवकार, अनिल जोशी, बसवेश्वर मिटकरी, विद्याधर खुमकर, विलास बेलाडकर,अनिल अवताडे,रवि शर्मा, सेवकराम हेरोडे आदी पत्रकारांनी व कुटुंबातील सदस्यांनी आरोग्य तपासणी शिबिरात सहभाग नोंदविला असून यावेळी तालुक्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून सहभाग नोंदविला असे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निलेश जवकार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे