अकोला,दि. 3 : – समाज कल्याण विभाग व समतादूत टीम बार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहात गुरुवार दि. 1 डिसेंबर रोजी युवा गटातील संघटक, सह संघटक व सभासदाकरिता मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
राज्यात २६ नोव्हेंबर हा ‘संविधान दिन’ आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरीनिर्वाणदिन’ ६ डिसेंबर या कालावधीत ‘समता पर्व’ साजरे होत आहे. याचाच एक भाग म्हणून समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ.अनिता राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कार्यक्षेत्रातील स्वयं सहाय्यता युवा गटातील संघटक, सह संघटक व सभासद यांचेकरीता व्यवसाय व उद्योग उभारणीसाठी येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह,संतोषी माता मंदिर अकोला येथे जिल्हास्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक नयन सिन्हा, ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्थाचे मनोज मेहर, नाबार्डचे सहायक महाप्रबंधक शरद वालके, जिल्हा उद्योग केंद्राचे मकरंद सरकटे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्रीमती लव्हाळे यांनी आपल्या विभागाच्या योजना व उद्योग उभारणीसाठी असणाऱ्या शासकीय सुविधांची माहिती दिली. तसेच युवा गटाना उद्योग व्यवसाय उभारतांना येणाऱ्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या व त्यांचे निराकरण करण्यात आले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अकोला जिल्हा प्रकल्प अधिकारी विजय पी.बेदरकर यांनी तर आभार प्रदर्शन मूर्तिजापूर तालुका समतादूत स्मिता राऊत यांनी केले.
Top Bollywood Celebrities With Expensive Cars