अकोला,दि. ३० :- अकोला जिल्ह्यातील शासकीय व स्वयंसेवी संस्थांमधील निराधार मुलांसाठी आजपासून (१ डिसेंबर) येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर जिल्हा स्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
अकोला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आणि बाल कल्याण समितीच्यावतीने जिल्हा स्तरावरील बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत अकोला जिल्ह्यातील शासकीय व स्वयंसेवी संस्थांमधील पुनर्वसनासाठी दाखल असलेल्या निराधार,उन्मार्गी,एकल पालक व कोवीड महामारीमध्ये अनाथ झालेल्या मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्यात सांघिक निर्माण होण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय ‘चाचा नेहरू बाल महोत्सवा’चे आयोजन करण्यात येत आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर सकाळी १०.३० वा. आयोजित या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य ॲड. संजय सेंगर उपस्थित राहणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा समारोप २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार असून या कार्यक्रमातच स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस प्रदाण करण्यात येणार आहे.