अकोला प्रती -: डॉ तरांगतूषार वारे यांचा प्रभारी असलेला उपसंचालक आरोग्य सेवा आरोग्य मंडळ अकोला यांचा पदभार काढुन घ्या अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी तुकाराम मुंढे आयुक्त आरोग्य सेवा आयुक्त (Health Services Commissioner) आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक यांना पाठवलेले पत्राद्वारे केली आहे डॉ तरंगतूषार वारे यांच्या कडे जिल्हा शल्य चिकीत्सक चा पूर्ण पदभार असून त्यांना उपसंचालक आरोग्य सेवा आरोग्य मंडळ चा जास्तीचा पदभार देऊन अकोला जिल्हा च्या रुग्णांवर व तसेच लोकानं वर अन्याय होत आहे. त्याचे कारण की अमरावती विभातिल 4 जिल्हातील रुग्ण सर्वोपचार रुग्णालय अकोला उपचार करीता येतात, काही कारणास्तव डॉक्टर त्यांना रेफर नागपूरला करतात, पण जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या वर उपसंचालकाचा पदभार असल्याने त्यांना मीटिंग, आणि ग्रामीण रुग्णालय ला भेट देतात. व जिल्हा बाहेर ही जातात त्यामुळे ,बरेच लोक मेडिकल सर्टिफकेट साठी येतात, मेडिकल बिल साठी लोक येतात,दुर्धर आजार च प्रमानपत्र असो की, रेफर नागपूर साठी ॲम्बुलन्स साठी सी एस ची सही लागते.पण जिल्हा शल्य चिकित्सक उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे .
त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ तरंगतुषार वारे यांचा अतिरिक्त असलेला उपसंचालक चा पदभार काढून त्यांना पूर्ण वेळ रुग्ण सेवा करता येईल. म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ तरंगतुषार वारे यांच्या कडे असलेला उपसंचालक आरोग्य सेवा आरोग्य मंडळ अकोला चा पदभार काढुन घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत.
तुकाराम मुंडे साहेब
आरोग्य सेवा आयुक्त (Health Services Commissioner) आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक
यांना दिलेल्या (पत्राद्वारे) निवेदनात केली आहे.
Top Bollywood Celebrities With Expensive Cars