अकोला,दि.19 :- अकोला जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मनपा क्षेत्रातील 14 ते 19 वयोगटातील मुला-मुलींसाठी आयोजित जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले.
येथील वसंत देसाई स्टेडियमवर दि. 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्राविण्यप्राप्त मनपा क्षेत्रातील विजयी शाळा संघाचे अंतिम निकाल जाहीर करण्यात आले असून विजेता शाळा याप्रमाणे :
- वयोगट 14 वर्ष (मुले)- विजयी: होलीक्रॉस कॉन्व्हेट, अकोला, उपविजयी: पोदार इंटरनॅशनल स्कुल, अकोला
- वयोगट 14 वर्ष (मुली)- विजयी: होलीक्रॉस कॉन्व्हेट, अकोला, उपविजयी: समर्थ पब्लीक स्कुल अकोला
- वयोगट 17 वर्ष (मुले)- विजयी: स्कुल ऑफ स्कॉलर्स, अकोला, उपविजयी: होलीक्रॉस कॉन्व्हेट, अकोला
- वयोगट 17 वर्ष (मुली)- विजयी: स्कुल ऑफ स्कॉलर्स, अकोला, उपविजयी: प्रभात किड्रस स्कुल, अकोला
- वयोगट 19 वर्ष (मुले)- विजयी: एल.आर.टी कॉलेज, अकोला, उपविजयी: शिवाजी महाविद्यालय, अकोला
- वयोगट 19 वर्ष (मुली)- विजयी: आर. डि. जी. कॉलेज, अकोला, उपविजयी : लक्ष्मीबाई दामोदर नेरकर महाविद्यालय, अकोला
या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट, विजय मालोकार तसेच प्रमुख अतिथी ॲड. शिशिर देशपांडे, क्रीडा अधिकारी मनिषा ठाकरे, पुरण गंगतीरे, तुषार देशमुख आदिंच्या उपस्थित झाले. जिल्हास्तर शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धाचे पंच निशाद डिवरे, तुषार देशमुख, शेखर डिवरे, दिपक धुळे, निंकुज खोसला, आनंद बोरोकार, सतिश देशमुख, सोनू हिवराळे, यश भदुका यांनी काम पाहिले. क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्याकरीता स्पर्धा संयोजक जिल्हा क्रीडा कार्यालयातील प्रशांत क्षापरकर, लक्ष्मीकांत उगवेकर, निशांत वानखडे, गजानन चाटसे, अजिंक्य धेवडे यांनी अथक परिश्रम घेतले.