अकोला,दि.१५ :- आदिवासी समाजक्रांतीचे जनक व महान स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, शैक्षणिक गुणवत्ता कक्षाचे जिल्हा समन्वयक गजानन महल्ले यांच्यासह उपस्थित अधिकारी – कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी- अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.