• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 6, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बोरगाव मंजू येथे कायदेविषयक जनजागृती महाशिबीर: मानवता हाच कायद्याचा आधार-न्या. सुवर्णा केवले

Our Media by Our Media
November 9, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
82 1
0
Suvarna Kevele
17
SHARES
595
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.9 :-  आपल्या संविधानात सर्वांना समान संधीचे आश्वासन देण्यात आले आहे. कायद्याची गरज ही समाजाच्या हितासाठी असते. कायदा हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. त्याविपरित आपले वर्तन झाले की मग समाजाच्या भल्यासाठी कायद्याची आवश्यकता भासते. त्यामुळे मानवता हाच कायद्याचा आधार आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुवर्णा के. केवले यांनी आज बोरगाव मंजू येथे आयोजित कायदेविषयक जनजागृती महाशिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले.

नागपूर उच्च न्यायालयाचे तथा अकोला जिल्ह्याचे पालक न्यायमुर्ति अनिल किलोर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने बोरगाव मंजू येथे परशुराम नाईक विद्यालयाच्या प्रांगणात ‘कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाद्वारे नागरिकांचे सशक्तीकरण आणि ‘हक हमारा भी तो है’ या मोहिमेअंतर्गत कायदेविषयक जनजागृतीसाठी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुवर्णा के. केवले, जिल्हाधिकारी निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, बोरगाव मंजू सरपंच श्रीमती अनिता खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, सहायक आयुक्त कामगार कल्याण राजू गुल्हाने, तहसिलदार सुनिल पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर व अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत वानखडे यांचीही उपस्थिती होती. तसेच जिल्हा बार असोसिएशनचे सर्व सदस्य व सर्व न्यायधीश उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांच्या लाभांचे प्रातिनिधीक स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. आपल्या संबोधनात पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यात कायद्याची माहिती जिल्हाभरात पोहोचविण्यासाठी वन व्हिलेज वन कॉन्स्टेबल ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी सांगितले की, नागरिकांनी त्यांचे अधिकार आणि हक्क यांची माहिती करुन घ्यावी, या माहितीचा उपयोग स्वतःच्या व समाजाच्या भल्यासाठी करावा. न्या. केवले म्हणाल्या की, लाभार्थ्यांना दिलेला लाभ म्हणजे त्यांचेवर कुणी उपकार केले असे नसून तो त्यांचा हक्क आहे, तो त्यांना देण्यात आला आहे. आपल्या हक्कांसाठी नागरिकांनी तगादा लावणे शिकले पाहिजे.आपल्या न्याय्य हक्कांसाठी जागरुक असणे हे आवश्यक असून ती सेवा विधी सेवा प्राधिकरण देत आहे. या सेवेमुळे संविधानाच्या मुळ हेतूला बळकटी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविक अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत वानखडे यांनी केले. आभारप्रदर्शन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी तर सह. दिवाणी न्यायाधीश विलास खांडबहाले व मृणाली भराडे यांनी सूत्रसंचालन केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या विविध योजना व सेवांच्या स्टॉल्सलाही नागरिकांनी प्रतिसाद दिला. मान्यवरांनीही या स्टॉल्सला भेटी देऊन माहिती जाणून घेतली.

Previous Post

जिल्हास्तरीय सिकई मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धा संपन्न

Next Post

पक्षी सप्ताहानिमित्तः विशेष लेख- पक्षांची आंघोळ

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
occasion of Bird Week

पक्षी सप्ताहानिमित्तः विशेष लेख- पक्षांची आंघोळ

Himachal pradesh poll

Himachal pradesh poll :हिमाचल प्रदेशमध्ये मतदानाच्या चार दिवस आधी काँग्रेसला मोठा धक्का, २६ नेत्यांचा राजीनामा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.