अकोला,दि.9 :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय सिकई मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धांचे आयोजन नुकतेच(दि.५) पार पडले. या स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलातील वसंत देसाई स्टेडियम येथे पार पडल्या. या स्पर्धांचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी सतिशचंद्र भट यांनी केले. यावेळी सिकई मार्शल आर्ट संघटनेचे खुशबु चोपडे, संतोष गजभिये आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे निकाल या प्रमाणे-
१४ वर्षा आतील मुले (मनपा क्षेत्र) वजनगट- २९- आकाश तायडे महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, ३३- उत्कर्ष गेडाम ज्युबिली इंग्लिश स्कूल, ३७- ओम इंदोरे महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, ४१- पियुष स्वामी स्वामी विवेकानंद स्कूल, ४५- प्रणव गायकवाड महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, ४९- आदेश इंगळे हॅप्पी अवर्स हायस्कुल, ४९ ओजस मुळे आरडीजी पब्लिक स्कूल, के-१- क्षितीज उचेकर हॅप्पी अवर्स हायस्कूल, एएसआय- आदवीक नगराळे होलीक्रॉस कॉन्व्हेंट.
१४ वर्षा आतील मुली (मनपा क्षेत्र) वजनगट-३१- प्रगती आपोतीकर बाल शिवाजी स्कूल, ३५- कानन मुरादे विवेकानंद प्रायमरी इंग्लिश स्कूल, ३९- साधना लाहाडके विवेकानंद प्रायमरी इंग्लिश स्कूल,४३- तमुश्री शिरसोले आरडीजी पब्लिक स्कूल, ४७- इश्वरी रोडे महाराष्ट्र कन्या शाला, ४७ वरील- शिवानी पुंडकर भारत विद्यालय, के-१- समृद्धी खंडारे हॅप्पी अवर्स हायस्कूल, एएसआय- स्माईली रामटेके स्कुल ऑफ स्कॉलर्स.
१७ वर्षा आतील मुले (मनपा क्षेत्र) वजनगट४४- अभिरव वानरे एमरॉल्ड इंग्लिश स्कूल, ५२- रणविर फाटे विवेकानंद इंग्लिश स्कूल, ५६- सार्थक जंजाळ नोवेल इंग्लिशस्कूल,६०- श्रीहर्ष गावंडे होलिक्रॉस कॉन्व्हेंट, ६० वरील सोहन निकाळजे श्री शिवाजी महाविद्यालय, के१- राजवर्धन इंगळे हेडगेवार स्कूल, के-२ यथार्थ टेकाडे हॅप्पी अवर्स हायस्कूल.
१७ वर्षाआतील मुली (मनपा स्तर) वजनगट ४०- फ्लॉरेन्स नाशिकर भारत विद्यालय, ४४- अनुराधा मानकर भारत विद्यालय, ५६ वरील श्रेया भातुलकर भारत विद्यालय, के-१- नंदिनी गंडेचा भारत विद्यालय, एएसआय- रुपेशवाई जाधव प्लॅटीनम ज्युबिली स्कूल.
१९ वर्षाआतील मुले (मनपा स्तर) वजनगट- ५८ आदित्य देशमुख जागृती कॉलेज, ६६ शिवम गावंडे डवले ज्युनिअर कॉलेज, एएसआय शिवम गावंडे डवले ज्युनिअर कॉलेज.
१४ वर्षाआतील मुले (ग्रामिण) वजनगट ५७- रुद्रांश घुगर- सेंट्पॉल ॲकेडमी हिवरखेड, तेल्हारा.
१७ वर्षाआतील मुले(ग्रामिण) वजन गट ४४- समर्थ राऊत, ४८- प्रणव हागे, ५२- कृष्णल गावंडे, ५६- पियुष खंडेराव, ६० वरील- जय वानखडे- सर्व सेंट पॉल ॲकेडमी हिवरखेड, ता. तेल्हारा.
१७ वर्षाआतील मुली(ग्रामिण) वजनगट- ३६- अनुजा एऊल, ५६ वरील- श्रावणी मानकर सेंट पॉल ॲकेडमी हिवरखेड, पातूर.
१९ वर्षाआतील मुले(ग्रामिण) वजनगट ६२- साहिल सावळे समता कनिष्ठमहाविद्यालय.
या स्पर्धांसाठी सिहान अरुण सारवान, खुशबु चोपडे, अक्षद गंडेचा, गायत्री चतरकर, मैथिली कापकर, रितिक अग्रवाल, प्रेम खेडेकर यांनी पंच म्हणून काम पाहिले.