अकोला- महाराष्ट्रा तील पत्रकाराची मात्र संघटना असलेल्या मराठी पत्रकार परिषद मुंबईचे 43 वे राष्ट्रीय अधिवेशन 19 व 20 नोव्हेंबर रोजी पुणे पिंपरी चिन्चवड येथे आयोजित करण्यात आलेले असून मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक मान्यवर या अधिवेशनाच्या उदघाटनास उपस्थित राहणार आहेत.
सोबतच टीव्ही चनेल्स वर एन्करिग करणारे प्रख्यात एन्कर्स प्रत्यक्ष या अधिवेशनात उपस्थित राहून संवाद साधनार् आहेत.वृत्तपत्र व पत्रकारांच्या व प्रिंट व इलेक्ट्रोनिक मीडियाच्या विविध् प्रश्नावर या अधिवेशनात चर्चा होणार आहे.मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख,किरण नाईक्, अध्यक्ष शरद पाबले,विजय जोशी,अनिल महाजन सह परिषदेचे आजी,माजी अध्यक्ष पदाधिकारी या अधिवेशनात उपस्थित राहणार आहेत.
अकोला जिल्ह्यातिल् सर्व पत्रकारानी पिंप्री चिंचवड पुणे येथील पत्रकाराच्या राष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित रहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा,अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजुरकर्, सचिव संजय खांडेकर,उपाध्यक्ष रामदास् वानखडे, गजानन सोमानी,सहसचिव् विजय शिंदे यांच्यासह जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निलेश जवकार यांनी कळविले आहे.