• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, September 15, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पक्षी सप्ताहानिमित्तः विशेष लेख घरटीः यांना हे कोणी शिकविलं?

Our Media by Our Media
November 7, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड, विदर्भ
Reading Time: 1 min read
107 1
0
पक्षी सप्ताह
16
SHARES
772
VIEWS
FBWhatsappTelegram

आपण पक्षांचे लहान नाजूक व बारीक काड्या व गवताच्या पानाने बनविले सुंदर घरट्याच्या सहज मोहात पाडतो. पण त्या खाठी त्यांनी घेतलेले अपार कष्ट अपण पहात नाही.

विणीचा हंगामा जसा सुरू होतो तसतसे पक्ष्यांमध्ये बदल घडताना दिसतात. खास करून नराचे बदल पटकन लक्षात येतात. जसेकाही नविन पिसांचा पेहराव करतात. कारण विणीच्या हंगामामध्ये मादी पेक्षा नरच सुंदर दिसतात कारण त्या काळात त्याचा पिसांवर एक चमक येते व तसेच बऱ्याच पिसांचे रंग बदलतात व नविन पिसांचा साज चढतो असे म्हणायला हरकत नाही. याच सुमारास नरांचा आवाज मोकळे होऊन त्यात अनेक स्वरांची भर पडते. नविन रंगाचे चमकदार पिसे फुलवुन व सुरात वेगवेगळे आवाज (गाणे) गाऊन आपला रुबाब दाखवून हे मादीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. काही पक्षी तर मादीला तिचे आवडते खाद्य, किडे व अळी भेट देवून वश करताना पाहीले.

हेही वाचा

तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक

तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन

या नंतर खरी परिक्षा सुरु होते. त्यात नर – मादी दोघे मिळून तर कधी नराला व मादी घर बांधण्याची सुरुवात करतात.

आपल्या कडे वेगवेगळ्या ऋतृत निरनिराळ्या जातीचे पक्षी निरनिराळ्या वेळी व आपापल्या पद्धतीने सभोवतालच्या परिस्थितीची व वातावरणाचा अंदाज घेऊन लागणारा अन्न पुरवठा परिपूर्ण राहिल.या काळात घरटी बांधताना त्याला लागणारा वेळ व घरट्यासाठी लागणारे साहित्य गवत, काडी व कापुन व त्या सारख्या मऊ उबदार वस्तू वापरून, तसेच जोराचा वारा व पाऊस पासून आणि इतरांपासुन संरक्षण होईल व सहज कोणाच्या नजरेत पडणार नाही,अशा ठिकाणी नाजुक घरटी बांधतात. त्यावेळी ते इतर काही अडचणी (हवा-पाणी) असल्यास त्याची पर्वा करत न करता सतत कार्य करत राहतात.

काही पक्षी आणि त्यांच्या घरट्यांचे प्रकार याप्रमाणे-

गरुड,घार, कावळा इ. (Eagle, Kite, Crow) सारखे मांस भक्षी पक्षी हे झाडावर काड्यापासुन घरटी बनवितात. (Munia) सारखे पक्षी गवतांच्या पानानी चेंडू सारखे व एकाबाजूला लहानसे प्रवेशद्वार ठेवून अंडी व पिलांसाठी उबदार हवा व पाण्यात ओले राहणार याचा विचार करुन मुनिया झाडावर तर चंडोल (Lark) चंडोल जमिनीवर घरटी घरटी बनवितात.

शिंपी, वटवट्या. (Tailor bird, warbler, prinia) सारखे पक्षी सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेणारे सहज लक्षात येणार नाही आशा ठिकाणी लहान पाने एकमेकांना चिपकुन विणुन घर बांधतात.

दयाळ, बुलबुल, चिमणी (Robin, Bulbul, Sparrow) यांची मानववस्तीत घराच्या कोपर्‍यात आडोश्याला पण घर बांधलेली दिसतात.

शिंजीर व सुगरण (Sunbird, Baya) ची घरटी लोंबकळणारी असतात. शिंजीर चे घरटेअगदी छोटे असून मजबूतीसाठी कोळीष्टकांचा वापर केलेला असतो. कोळ्याचे जाळे वाटावे असे. सुगरण पक्ष्याचे घरटे विहिरीवर, काटेरी झाडाच्या झुकलेल्या फांदीला विणलेले असते. घरटे मधेच फुगीर असून खाली निमुळते नळकांड्यासारखे प्रवेशद्वार.

सुतार,ताबंट (Woodpecker, Barbet) मजबूत चोचीने झाडाची फांदी पोखरून त्यात घरटे बनवितात व अंडी देवुन संगोपन करतात.

पोपट, घुबड, पिंगळा, दयाळ, धनेश, साळुंकी, रामगंगा (Owlet, Parakit, Myna, Hornbill) सारखे उपरे पक्षी दुसऱ्यांनी पोखरलेल्या आयत्या ढोलीवर व तसेच झाडांमधील नैसर्गिक ढोल्यांचा ताबा हक्क दाखवून त्या ढोलीचा वापर करतात.

धूसर,मार्टिन स्वालो (Swift, Swallow) सारखे पक्षी हे घुमट, उंच कमान व भिंतीवर एखाद्या पुलाखाली व बाहेर डोकावणाऱ्या कड्यावर खडकाखाली एकटे किंवा एकमेकांना चिकटलेली व त्याला खाली किंवा बाजूस प्रवेशद्वार असलेली लहान माठांप्रमाणे चिखलाचे ओल्या माती पासुन व आतून गवत व मऊपिसे चिकटवून घर बनवतात.

तितर, टिटवी,मोर (Partridge, Quail Lapwing) सारखे जमिनीवर राहणारे पक्षी पायांनी किंवा चोचीने माती उकरून केलेला छोटा खळगा करुन उघड्यावरच अंडी देतात व त्याच्या आजूबाजूला आडोश्याला मिळता जुळत्या आकाराचे दोन चार दगड व मातीचे ढेकळं ठेवतात. मोर पण आपली अंडी यांच्या प्रमाणेच धुऱ्यावर व लहान झाडाच्या आडोशांनी जमीनीवरच देतो.

धीवर व राघू (Bee-eater Kingfisher) प्रजातीचे पक्षी भुसभुशीत मातीची जागा शोधून त्यांच्या चोचीने एक मिटर आडवे लांब बीळ खोदून त्यात अंडी देतात तर शत्रूंना मूर्ख बनविण्यासाठी आजूबाजूला अनेक खोटी बिले खोदुन ठेवतात.

करकोचे,बगळे (Cormorant, Heron, Egrat) सारखे पक्षी एकटे तर कधीकधी समूहाने पाण्याजवळ गवताळ झाडीत घरटे करतात.

कमळ पक्षी, पाणपक्षी (Jacana, Little grebe) सारखे काहीपक्षी पाण्यातील पाणवनस्पती एकत्रित आणुन त्या पासुन पाण्यातचओबडधोबड घरटे बांधतात. कमळपक्षी अगदी थोडे पान जमा करत त्यावर आपली अंडी घालतो पाणवनस्पती पासुन ओबडधोबड घरटे करतात.

घरटे बांधुन व अंडी उबविण्याचे त्या नंतर पिल्लांचे संगोपन व संवर्धन करत असताना घरट्याची साफसफाई पण वेळेवर नियमीत करत असतात.

एकंदरपक्षांची अदभूत अशी रचना असणारे घरटे पाहिल्यावर हे सर्व यांना कोणी शिकविले?

ह्या सर्व गोष्टीचा विचार करता कोणत्याही पक्षी घरटे बांधताना दिसल्यास व ज्या घरट्यात पक्ष्यांचा वावर आहे (अंडी व पिल्ले आहेत) त्याला व त्यांच्या घरट्याला कोणताही त्रास न देता त्यांना संरक्षण देणे हे आपले कर्तव्य आहे.

-देवेंद्र तेलकर, अकोला.

लेखकःवन्यजीव अभ्यासक आहेत.

Previous Post

पक्षी सप्ताहानिमित्तः विशेष लेख – आखातवाड्याचा “निपान”

Next Post

विदर्भात नावारूपास आलेल्या वैकुंठधामाची दुरवस्था,मोबाईलच्या टॉर्चवर अंतीमसंस्कार

RelatedPosts

तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक
Featured

तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक

September 10, 2025
तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन
Featured

तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन

September 10, 2025
Featured

जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा मान्यतांची कार्यवाही तत्काळ पूर्ण करा – जिल्हाधिकारी वर्षा मीना

August 29, 2025
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
Featured

आयुष्मान भारत अंमलबजावणीत अकोला जिल्हा सातवा मोबाईलने इ केवायसी करा, पाच लाखांचे कवच मिळवा

August 29, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
Featured

फलोत्पादन विकास अभियानात आता औषधी व सुगंधी वनस्पतीचा समावेश

August 25, 2025
कीटकनाशक फवारणी दक्षतेबाबत कृषी विभागाची जनजागृती मोहिम जिल्हाधिका-यांच्या हस्ते शुभारंभ
Featured

कीटकनाशक फवारणी दक्षतेबाबत कृषी विभागाची जनजागृती मोहिम जिल्हाधिका-यांच्या हस्ते शुभारंभ

August 25, 2025
Next Post
विदर्भात नावारूपास आलेल्या वैकुंठधामाची दुरवस्था,मोबाईलच्या टॉर्चवर अंतीमसंस्कार

विदर्भात नावारूपास आलेल्या वैकुंठधामाची दुरवस्था,मोबाईलच्या टॉर्चवर अंतीमसंस्कार

Nima Arora

जिल्हा उद्योग मित्र समिती बैठक ; औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन केंद्र कार्यान्वित करा - जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन

तेल्हारा तालुक्यामध्ये सेवा पंधरवडा होणार साजरा,तहसिलदार समाधान सोनवणे यांचे आवाहन

September 10, 2025
तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक

तेल्हारा पोलिसांचा समाजासमोर आदर्श : चक्क बैलगाडीतून बाप्पाची मिरवणूक

September 10, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.