यूजीसी नेट परीक्षा २०२२ (NET Exam 2022) चा निकाल उद्या (५ नोव्हेंबर) जाहीर होणार. याबाबत अधिकृत माहिती यूजीसीचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी आज सकाळी ट्विट करत दिली आहे. परीक्षेस बसलेले विद्यार्थी त्यांचा निकाल UGC NET ची अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जाऊन पाहू शकतात. ही परीक्षा देशभरात चार टप्प्यात झाली होती. यूजीसी नेट 2022 परीक्षेचा निकाल ugcnet.nta.nic.in या वेबसाईटवर ऑनलाइन उपलब्ध होईल. विद्यार्थी त्यांचा अॅप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख यांची नोंद करून निकाल बघू शकतील.
यूजीसीने नेट परीक्षेची उत्तरतालिका जाहीर केल्यानंतर विद्यार्थांना निकालाची उत्सुकता लागली असेल. (NET Exam 2022) पण तुम्हाला जास्त दिवस उत्सुकता करावी लागणार नाही. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) निकालाची तारीख जाहीर केली आहे. अधिकृत माहिती यूजीसीचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी आज सकाळी ट्विट करत दिली आहे. युजीसी नेट निकाल २०२२ पाच नोव्हेंबर रोजी लागणार आहे. हा निकाल डिसेंबर 2021 आणि जून 2022 सत्रांसाठी जाहीर केला जाईल. डिसेंबर २०२१ मध्ये नेट परीक्षा होऊ शकली नव्हती. त्यामुळे डिसेंबर २०२१ आणि जून २०२२ या दोन्ही सत्रांची एकच सामायिक परीक्षा घेण्याचा निर्णय ‘एनटीए’कडून घेण्यात आला होता.
असा पाहा UGC NET 2022 निकाल
1. प्रथम UGC NET ची अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जा.