अकोला,दि.4 आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत आयुष्यमान गोल्डन ई-कार्ड व आभा ई-कार्ड तयार करण्यासाठी दि. ७ ते १९ नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण व तालुकास्तरावर जनजागृती मोहिम राबवून योजनेचा लाभ पात्रताधारक लाभार्थ्यांना मिळेल याकरीता सुक्ष्म नियोजन करा, असे निर्देश जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी संबधित विभागाने दिले.
आयुष्यमान भारत गोल्डन व आभा ई-कार्ड मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी सामुदाय आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांच्यावर तर सनियंत्रणाची जबाबदारी संबधित विभाग प्रमुख यांच्या देण्यात आली आहे. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आयुष्यमान गोल्डन व आभा ई-कार्ड तयार करण्यासाठी लाभार्थ्यांनी आधारकार्ड, रेशनकार्ड, मोबाईल क्रमांक व पासर्पोट फोटो इ. आवश्यक कागदपत्रासह आपल्या जवळच्या सामान्य सेवा केंद्र येथे भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदव्दारे करण्यात येत आहे.