अकोला, दि.2:- महिलांमध्ये स्तन कर्करोगाविषयी जागरुकता निर्माण व्हावी याकरीता आयकॉन हॉस्पीटल, अकोला व्दारे स्तन कर्करोग जागरुकता व मार्गदर्शन शिबीर आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात करण्यात आले. महिला कर्मचाऱ्यांनी आरोग्यविषयक जागृत राहून नियमित व्यायाम व पौष्टीक आहाराकडे लक्ष द्यावे. तसेच महिलांनी नियमितपणे आरोग्य तपासण्या कराव्या, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.
यावेळी आयकॉन हॉस्पीटलचे कॅन्सर सर्जन अमितकुमार बरगडीया यांनी स्तन कर्करोगाचे कारणे, लक्षणे, प्रतिबंधात्मक करावयाचे उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन सादरीकरणाव्दारे केले. तसेच महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाचे निराकरण डॉ. बरगडीया यांनी केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, आयकॉन हॉस्पीटलचे अध्यक्ष डॉ.के.के अग्रवाल, आयकॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रामधन शिंदे, तसेच विविध विभागाचे महिला कर्मचारी उपस्थित होते.