अकोला,दि.29 :- जनजाती गौरव दिनाचे(दि.15)औचित्य साधून आदिवासी विकास विभागाव्दारे दि. 15 ते 18 नोव्हेंबर, या कालावधीत नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथे राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये राज्यस्तरीय आदिवासी पारंपारिक हस्तकला प्रदर्शन व विक्री, पारंपारिक खाद्य महोत्सव, पारंपारिक नृत्य स्पर्धा आणि लघुपट/माहितीपट इत्यादी उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या उपक्रमात सहभाग नोंदविण्यासाठी जिल्ह्यातील आदिवासी बांधव व बचत गटानी मंगळवार दि.1 नोव्हेंबर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अर्ज करावा. तसेच उपक्रमासंबंधीत अधिक माहिती व आवेदन अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, महसूल भवन, न्यु. राधाकिसन प्लॉट, अग्रसेन भवन, अकोला येथे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तरी आदिवासी बांधव व आदिवासी बचत गटानी आदिवासी सांस्कृतिक महोत्सवात मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक प्रकल्प अधिकारी(विकास) मोहनकुमार व्यवहारे यांनी केले आहे.