रिधोरा ( पंकज इंगळे)- बाळापूर तालुक्यातील ग्राम रिधोरा येथील सर्पमित्र प्रशांत दंदी याने आजपर्यंत चार हजारच्या वर सापांना जीवनदान दिले आहे. साप महटले की, अंगावर शहारे व मनात भीती निर्माण होते. मात्र, बाळापूर तालुक्यातील रिधोरा सर्पमित्र प्रशांत दंदी याला सापाचे वेड आहे. कुठेही साप निघाला, तर अगोदर सर्पमित्र प्रशांत दंदी यांना फोन येतो व प्रशांत हातातील काम बाजूला सारून साप पकडण्याची काठी घेऊन साप पकडायला निघतो. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील परिसरात लहान-मोठ्या खेड्यात कुठलीही अपेक्षा न करता, तो आपले काम इमाने इतबारे गेल्या सहा ते दहा वर्षांपासून करीत आहे.
त्याने आतापर्यंत चारहजार हून अधिक साप पकडून त्यांना जीवनदान दिले आहे. त्याच्या सोबतीला गावातील त्यांनी तयार केलेला सर्पमित्र ग्रुप मधील युवक त्यांच्या सोबत येण्यास उत्सुक असतात . दिनांक 24 ऑक्टोबर सोमवारी लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळीच्या दिवशी सुद्धा त्यांनी रिधोरा येथे आज एक धामण जातीच्या सापांना पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडले. तसेच त्यांनी आतापर्यंत विषारी व बिनविषारी सापांना आपला जीव धोक्यात टाकून जिवंत सापांना जीवनदान देणारे सर्पमित्र मात्र शासनाकडून उपेक्षित आहेत.