अकोला दि. 19 :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा संकूल व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा २०२२-२३ चा प्रारंभ आज न्यु इंग्लिश स्कूल येथे करण्यात आला. मुख्याध्यापक माधव मुंशी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उदय हातवळणे, श्रीकृष्ण तराळे, श्रीमती एम. जी. ठाकरे, डॉ. विनीत तिवारी, सचिन तायडे, संतोष लोमटे. मयुर निंबाळकर. दीपक शिरसाट, किरण पारडे, मयुर चौधरी, संजय पांडे आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मनपा व जिल्हा क्षेत्रातील १४, १७ व १९ वर्षांआतील मुलांचे सामने झाले.
त्याचे अंतिम निकाल याप्रमाणे-
मनपा क्षेत्रः-
१४ वर्षा आतील मुले- प्रथम- प्रभात किड्स स्कुल, सोमठाणा, द्वितीय- पोद्दार इंटर नॅशनल स्कूल. तृतीय नोएल कॉन्व्हेंट.
१७ वर्षाआतील मुले- प्रथम नोएल कॉन्व्हेंट, द्वितीय पोद्दार इंटर नॅशनल स्कूल, तृतीय नोएल कॉन्व्हेंट(स्टेट बॅंक).
१९ वर्षाआतील मुले – प्रथम श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल महाविद्यालय, द्वितीय- नोएल कॉन्व्हेंट, तृतीय प्रभात किड्स स्कुल सोमठाणा.
जिल्हा क्षेत्र (ग्रामिण)-
१४ वर्षा आतील मुले- प्रथम- विद्यांचल स्कूल, अकोट, द्वितीय- समर्थ पब्लिक स्कूल रिधोरा. तृतीय- ज्युबिली इंग्लिश हायस्कूल कुंभारी.
१७ वर्षाआतील मुले- प्रथम नॅशनल मिलिटरी स्कूल, गायगाव, द्वितीय विद्यांचल स्कूल अकोट, तृतीय शिव विद्यालय, चतारी ता. पातुर.
१९ वर्षाआतील मुले – प्रथम- नॅशनल मिलिटरी स्कूल, गायगाव.
या स्पर्धेसाठी उदय हातवळणे, श्रीकृष्ण तराळे, कुशल भिडे, सोहम सातव, केतन मुंशी यांनी पंच म्हणून काम पाहिले.