अकोला, दि.17 :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तालुका व जिल्हास्तरावर नेहरु युवा केंद्रामार्फत युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण व तालुका स्तरावरील कलावंताना कलागुण प्रर्दशीत करण्याचे उत्तम संधी मिळाली आहे. ग्रामीण भागातील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहरु युवा केंद्राने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.
येथील आबासाहेब खेडकर सभागृहात जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी बोलत होत्या. या महोत्सवात मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार, जिल्हा समन्वयक अधिकारी गजानन महल्ले, नेहरु युवा केंद्राचे महेश सिंह शेखावत आदि उपस्थित होते.
विजय देशमुख यांनी प्रास्ताविकेत सांगितले की, युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय, भारत सरकारच्या आदेशानुसार नेहरु युवा केंद्राच्यामार्फत जिल्हास्तरीय युवा महोत्सव राबविण्यात येत आहे. या महोत्सवामध्ये 15 ते 29 वयोगटातील युवकांनी चित्रकला, कविता, लेखन छायाचित्र, भाषण प्रतियोगीता व सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी स्पर्धा घेण्यात येत आहे. यासाठी तालुकास्तरावरील चाचण्यात विजेतांना जिल्हास्तरावर निवड करण्यात आले आहे. त्यांनतर जिल्हास्तरावरील विजेतांना राज्यस्तरीय स्पर्धा तर राज्यस्तरीय विजेत्यांना राष्ट्रीयस्तरावर भाग घेता येणार आहे.
जिल्हास्तरीय युवा उत्सवात विविध स्पर्धा
जिल्हास्तरीय कविता स्पर्धा – प्रथम क्रमांक टिना विनोद वानखडे, व्दितीय क्रमांक पायल कडू, तृतीय क्रमांक हर्षदा इंगळे.
जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा – प्रथम क्रमांक सुमित चहाटे, व्दितीय क्रमांक तनिश खोपे, तृतीय क्रमांक तृप्ती शर्मा.
जिल्हास्तरीय फोटोग्रॉफी स्पर्धा – प्रथम क्रमांक साक्षी साबळे, व्दितीय क्रमांक अश्विनी भरणे, तृतीय क्रमांक सुरज डोंगरे.
जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा – प्रथम क्रमांक साक्षी भोपळे, व्दितीय क्रमांक सानिया खान, तृतीय क्रमांक वैष्णवी राठोड.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विशाल राखोंडे यांनी तर आभार प्रदर्शन नेहरु युवा केंद्राचे महेशसिंह शेखावत यांनी केले. यावेळी परिक्षक, कलाकार व प्रेषक मोठ्या संख्येने उपस्थित होते.