अकोला, दि.15 :- स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशु विज्ञान संस्था अकोला यांच्यामार्फत जागतिक अंडा दिनानिमित्त मोरगाव भाकरे ता. बाळापूर येथे शुक्रवार(दि.14) जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोफत अंडी वाटप करण्यात आले.
यावेळी अंड्याचे आहारातील महत्व व फायदेविषयी माहिती देऊन रोग प्रतिकार क्षमता वाढीसाठी अंत्यत महत्वाचे असल्याचे स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशु विज्ञान संस्थाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. धनंजय दिघे यांनी सांगितली. तसेच विद्यार्थ्यांकडून “संडे हो या मंडे रोज खावो अंडे ” अशा उदघोषणा म्हणवून घेतला. यावेळी डॉ. चैतन्य पावसे, डॉ. मिलिंद थोरात, डॉ प्रशांत कपले, डॉ. प्राजक्ता कुरळकर, मोरगाव भाकरे सरपंच उमाताई माळी, गावातील नागरिक गणेश भाकरे, अभिजित फंदात, पोस्ट ग्रॅज्युएट विदयार्थी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सतीश मनवर यांनी केले. तर सूत्रसंचालक विभाग प्रमुख जीवरसायनशास्त्र डॉ. प्रशांत कपले यांनी व आभार प्रदर्शन डॉ प्राजक्ता कुरळकर यांनी केलं.